Home आरोग्य चिंताजनक : २ दिवसांत २८८ पोलिसांना कोरोनाची लागण !

चिंताजनक : २ दिवसांत २८८ पोलिसांना कोरोनाची लागण !

0
40


 

मुंबई (वृत्तसंस्था) दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांनी कोरोनाची लागण झाली असून पोलिस दलातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १,६६६ पर्यंत पोहोचला आहे. तर आतापर्यंत १६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १४८३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ४७८ पोलिसांनी कोरोनाच्या विषाणूशी यशस्वी लढा दिला आहे. यामध्ये ३५ पोलीस अधिकारी आणि ४३८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण प्रकरणं, ४४,५८२ पर्यंत पोहोचली आहेत.


Protected Content

Play sound