


जळगाव, प्रतिनिधी । येथील भावेश धीरज ठाकूर यांची पोलीस सेवा संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना त्याच्या सामाजिक व पोलिसांना केलेल्या सहकार्याची दखल घेऊन नियुक्त करण्यात आले आहे.
पुणे येथील शिवराज्य कामगार हक्क संघटनेच्या संलग्नित पोलीस सेवा संघटनेच्या त्रैमासिक बैठकीत जळगाव जिल्हाध्यक्षपदी भावेश धीरज ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे यांनी केली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र ठाकूर यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियुक्तीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


