पावसाळयापूर्वी शेंदूर्णी नदीवरील पूल पूर्ण करणार – नगराध्यक्षा खलसे

शेंदूर्णी प्रतिनिधी । शहरात विविध विकास कामे मंजूर करण्यात आले असून गावातील खळवाडी भागात नदीवर फरशी पूल पूर्ण करण्यात आला असून मोचीवाडा परिसरात पूल पावसाळ्यापुर्वी पूर्ण करणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षा विजया खलसे यांनी व्यक्त केला.

सध्यस्थितीत नगरपंचायत नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल व त्यांचे सहकारी नगरसेवकांनी सोन नदीवर मंजूर करण्यात आलेल्या वाल्मिक नगर काशीविश्वेश्वर मंदिराजवळ उभारण्यात येण्याऱ्या ३० पाईपच्या फरशी पुलाचे कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान विविध विकास कामे मंजूर झाले आहे. गावातील वाढीस वस्त्यांमध्ये रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम तर गावातील मुख्य रस्त्यावर पेव्हर बसविण्याचे काम प्रगती पथावर आहे.

विकास कामांकडे सर्वांचे लक्ष ठेवून
गावातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी व्यक्तिशः नगरसेवक निलेश थोरात, शरद बारी, राहुल धनगर, सतिष बारी, आलीम तडवी, श्रीकृष्ण चौधरी, शाम गुजर, गणेश पाटील, नगराराध्यक्ष पती अमृत खलसे, उपनगराध्यक्षा पती गोविंद अग्रवाल, नगरसेविका पती संजय गायकवाड, योगेश बारी, विजय धुमाळ, शंकर बारी, धीरज जैन व गजानन धनगर हे कामावर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन नागरिकांना आपल्या शेतात व खळ्यात जाता येत नव्हते म्हणून हे ४ पूल मंजूर करण्यात आले असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलांचे कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

Protected Content