राजपूत समाजाच्या जात प्रमाणपत्रांसाठी पालकमंत्र्यांना साकडे !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील राजपूत भामटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणीत येत असून याबाबत समाजबांधवांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना साकडे घातले आहे.

राज्यातील राजपुत भामटा भटक्या जमाती समाजाला जातीप्रमाण पत्र अभावी विविध शैक्षणिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने ना गुलाबरावजी पाटील यांनी या समस्या व अडचणींचे निराकरण करावे अशी मागणी राजपुत समाजाच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. राजपुत समाजाच्या शिष्ठ मंडळाने महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांची भेट घेत समाजाची व्यथा मांडली.

यावेळी राजपुत समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिलेल्या राज्यातील समाज बांधवांना व्हीजेएनटी राजपुत भामटा भाटक्या जमाती जात प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ) न मिळावे यासाठी काही समाजाचे विघ्नसंतोषी मंडळी कडुन अडचणी निर्माण करण्यात येत आहे. यावर पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. भविष्यात राज्यातील राजपुत समाज बांधवांच्या जातीचे दाखले व आदी समस्यावर आपण त्वरीत मार्ग काढु असे आश्वासन दिले आणी यापुढे जातीच्या दाखले मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही असे आश्वासीत केले.

आपण या विषयी राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून राजपुत समाज जाती दाखलेची समस्याही कायम स्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न करणार असे असे आश्वासन ना गुलाबराव पाटील यांनी दिले. याप्रसंगी पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक व बाळासाहेबाची शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्यासह राजपूत समाजाचे मन्यारखेडाचे माजी सरपंच व बाळासाहेबांची शिवसेना तालुका उप प्रमुख राजू पाटील व पिंटू भाऊ आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Protected Content