इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात ; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

रायगड (वृत्तसंस्था) इन्स्टाग्रामवर झालेली मैत्री एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला धमकावीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

रोडे-काश्मीरे येथील रहिवासी प्रशांत सदाशिव पाटील याने एका अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. ही मुलगी 11 मार्च 2020 रोजी कॉलेजवरून एकटी घरी जात असतांना आरोपी तरुणाने तिचा पाठलाग करुन तिच्या प्रेम प्रकरणाबाबत आई-वडीलांना सांगेन, असे धमकावले. त्यानंतर आरोपीने तरुणीला ब्लॅकमेल करत तिला मुंबई-गोवा महामार्गावरील लॉजवर नेले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी प्रशांत पाटील याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content