सह्याद्री फाउंडेशनतर्फे वर्डी गावात फवारणी

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डी गावामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सह्याद्री फाउंडेशनतर्फे गावात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. यापूर्वीही सह्याद्री फाउंडेशनने १२०० मास्क व १००० साबणाचे वाटप केले आहे.

वर्डी गावांत सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. याप्रसंगी सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विकास हिम्मतराव शिंदे यांनी नागरिकांना घरी रहा, सुरक्षित रहा असे आवाहन केले. या फवारणीसाठी जि. प. सभापती ज्योती राकेश पाटील यांनी ४० लिटर सोडियम हायपोक्लोराईड स्वखर्चाने दिले. भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल व नगराध्यक्ष जीवन चौधरी यांनी फवारणी यंत्र उपलब्ध करून दिले. याप्रसंगी सह्याद्री फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. विकास शिंदे, कार्यकारणी सदस्य विवेकश्री गुर्जर ,लहुश नायदे, मिलिंद साळुंखे, सचिन शिंदे, हर्षल शिंदे, महेंद्र पाटील, नितीन शिंदे, योगेश शिंदे, संदीप शिंदे, सुशील साळुंखे, विजय साळुंखे, कुणाल शिंदे, हारून पिंजरी, आमिन पिंजरी, गणेश चव्हाण, दीपक पाटील ,इदुभाऊ पिंजारी, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, भाजपा चिटणीस राकेश पाटील, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब पाटील , हिम्मतराव शिंदे, नंदलाल शिंदे, ,पोलीस पाटील पद्माकर आबा पाटील, सरपंच नंदलाल पाटील, उपसरपंच बारकु नाना पाटील, प्रा. मच्छीन्द्र साळुंखे, बंटी शिंदे, सचीन डाभे, विनायक शिंदे, दत्तात्रय पाटील, शशिकांत शिंदे, किशोर शिंदे, भागवत शिंदे, सागर शिंदे, गौरव शिंदे, प्रभाकर शिंदे, प्रदीप शिंदे, साई शिंदे, दीपक शिंदे, कांतीलाल शिंदे, नरसिंह चव्हाण, मयूर नांनवरे, घनश्याम पाटील, भैय्या नायदे, संजय पाटील , राजू देशमुख मार्तंड कोळी, समस्त शिंदे परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content