केळी पिकाला आले चांगले दिवस : केळी उत्पादक शेतकरी झाला प्रसन्न (व्हिडिओ)

वरणगाव, दत्तात्रय गुरव ।  जळगाव जिल्ह्यातील तापी पट्टा हा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो. गेल्या  वर्षापासून केळीला कोरोनामुळे चांगल्याप्रकारे भाव मिळत नव्हता, परंतु गेल्या दोन महिन्यापासून केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळत असल्याने बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गेल्या  वर्षांमध्ये कोरोनामुळे केळीला 350 रुपयाचा भाव मिळत होता त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्याचा निघत नव्हता परंतु गेल्या दोन महिन्यापासून केळीला बाराशे ते तेराशे रुपयाचा दर मिळत आहे मुक्ताईनगर तालुक्यातील काही शेतकऱ्यांची केळी आज अकराशे रुपये दराप्रमाणे विकली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मुक्ताईनगर तालुक्यातील केळी आहेत सध्या दिल्लीला विक्रीसाठी नेहली जात आहे सध्या केळी पिकाला चांगले दिवस आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/286499713238021

Protected Content