प्रभू श्री रामाचे चरित्र हे प्रत्येकाने जगावे- जनार्दन हरीजी महाराज ( व्हिडीओ )

फैजपूर, ता. यावल निलेश पाटील । प्रभू श्रीरामाचे चरित्र हे प्रत्येकाने जगले तर आपला देश विश्‍वगुरू बनेल असा आशावाद येथील सत्पंथी मंदिर देवस्थानाचे गादीपती तथा महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केला. ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या शिलान्यासासाठी देशभरातून फक्त १३० संत व महंतांना आमंत्रण होते. यात महाराष्ट्रातून फक्त दोन संत यात सहभागी झाले. त्यातील एक म्हणजे जनार्दन हरीजी असल्याची बाब जिल्हा वासिायांसाठी अतिशय अभिमानाची आहे. या पार्श्‍वभूमिवर, अयोध्या येथून परतलेले जनार्दन हरीजी महाराज हे प्रस्तुत प्रतिनिधीशी भरभरून बोलले. ते म्हणाले की, अयोध्या येथील शीलान्यासाचा कार्यक्रम हा शेकडो वर्षातून एकदाच आलेला आणि अर्थातच याचमुळे ऐतिहासीक असा होता. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. शिलान्यास कार्यक्रमाच्या दिवशी अयोध्या ही अक्षरश: वैकुंठ नगरी वाटत होती. जसे वैकुंठात कोणताही भेद नसतो. अगदी तेथे त्या दिवशी मला तसेच वाटले.

जनार्दन हरीजी महाराज पुढे म्हणाले की, प्रभू श्रीराम यांचे जीवन हे आदर्श असे होते. त्यांचा आदर्श अंमलात आणणे हे खूप महत्वाचे आहे. यामुळे आपण प्रभू श्रीराम यांचे चरित्र जगण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास भारत खर्‍या अर्थाने विश्‍वगुरू बनेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

खालील व्हिडीओत पहा महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांची मुलाखत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/894921077666992

Protected Content