चाळीसगाव येथे ‘रहा अपडेट’ व्हॉट्सॲप गृपतर्फे वृक्षारोपण

WhatsApp Image 2019 07 13 at 1.22.51 PM

चाळीसगाव प्रतिनिधी | येथील ‘रहा अपडेट’ व्हॉट्सॲप  ग्रुप च्या माध्यमातून गेल्या महिनाभरापासून शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. तसेच त्याच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात येत आहे. यानुसार आज शनिवार १३ जुलै रोजी श्रीपत नगर येथील निरंजन लद्दे यांच्या घरी वृक्षरोपण करण्यात आले.

ज्यांनी कोणी वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली असेल त्यांना ‘रहा अपडेट’ व्हाट्सअपग्रुपच्या माध्यमातून वर्धमान धाडीवाल यांच्यातर्फे व प्रादेशिक वनीकरण आणि सामाजिक वनीकरण या वनविभागाच्या माध्यमातून झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या रोपांची जगण्याची हमी रोप लावणाऱ्याकडून घेण्यात येत आहे. यामोहिमेअंतर्गत दिनांक १३ जुलै रोजी चाळीसगाव श्रीपत नगर ,मिलच्या मागे येथील रहिवाशी निरंजन लद्दे यांच्या घरी ७ वृक्षांची लागवड करून या वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. हे वृक्षारोपण करत असताना वृक्ष जगवण्याची उत्सुकता श्री लद्दे मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आली. या वृक्षारोपणाच्या प्रसंगी याग्रुपचे सदस्य दिलीप घोरपडे, वर्धमान धाडीवाल, मुराद पटेल,शरद पाटील,प्रताप देशमुख,खुशाल पाटील, कुणाल कुमावत, रामलाल मिस्तरी , गणेश आप्पा गवळी, डॉ संतोष मालपुरे ,सौ.लद्दे वहिनी यांच्यासह या कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.

Protected Content