सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

चाळीसगाव प्रतिनिधी । शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून चाळीसगाव येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी लळींग येथे छत्रपतींच्या शिवराज्याभिषेक प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि छत्रपती शिवरायांच्या नावाच्या जयघोष केला.

राज्यात दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन हा शिवप्रेमी रायगडावर जाऊन जल्लोषात साजरा करत असतात‌. मात्र गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाची साथ सुरू असल्याने रायगड किल्ल्यावर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर चाळीसगाव येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी लळींग येथील किल्लेवर जाऊन छत्रपतींच्या शिवराज्याभिषेक प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयघोष घोषणा बरोबरच प्लास्टिकच्या पडलेल्या कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. दरम्यान हि पर्यटक म्हणून आलेल्या मंडळींनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग नोंदवला. यावेळी 

सह्याद्री प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, गजानन मोरे, विनोद शिंपी, जितेंद्र वाघ, शुभम चव्हाण, रविंद्र दुसिंग, गणेश पाटील, नाना चौधरी, जितेंद्र वरखेडे, मोहन भोळे, अजय घोरपडे, अक्षय अहिरराव, आतिष कदम, समीर शिंपी, साहील शिंपी,  कैलास चौधरी, सुमीत वरखेडे व राज भोळे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर धुळे येथील किल्ले लळींग संवर्धन समीतीचे सुरेश सुर्यवंशी व देशमुख यांनी किल्ल्यावरील अनेक अवशेष विषयी माहिती दिली.

Protected Content