आयुध निर्माणीत दारू नेल्याने पंतप्रधानाकडे तक्रार

 

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात निवडणूक काळात अवैधरित्या दारू आत नेण्यात येत होती, याबाबत पोलिसात एफआयआर दाखल न केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून यावर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, डिसेंबर २०२० मध्ये वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात युनियनची निवडणूक असतांना युनियनच्या दोघा कर्मचाऱ्यांना अवैधरित्या दारूच्या ३५ बाटल्या आयुध निर्माणी कारखान्यात नेत असतांना गेटवर पकडण्यात आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी तक्रार केल्यानंतर महा प्रबंधक यांनी त्यांना निलंबित केले. मात्र, याबाबत कोणतीही एफआरआय पोलिसात दाखल केली नाही. आयुध निर्माणी हे प्रतिबंधित क्षेत्र असून येते दारू नेण्यास बंदी आहे. असे असतांना दारू आत नेली जात असल्याने आयुध निर्माणीचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यास जबाबदार असणाऱ्या सुरक्षा विभागाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खन्ना यांनी केली आहे.

Protected Content