एरंडोल तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी। सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. साऱ्यां जगावर चिंतेचे सावट पडले आहे. एकीकडे कोरोनाच्या संसर्गाचा धोका असतांना आज दि. १० मे रोजी एरंडोल तालुक्यासह कासोद्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कोरोना विषाणूच्या भितीने शेतकऱ्यांना मजुर मिळाले नाहीत.  खरिप हंगामातील पिके कापून पडलेली आहेत. तर काही पिकं मजूर न मिळाले म्हणून उभेच आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान झाले असून गुरांचा चाराही पावसाने खराब झाला आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान या पावसाने झाले आहे. शासनातर्फे मदत मिळावी म्हणून शेतकरी व व्यापारी बांधव मागणी करीत आहे.

Protected Content