मनवेल येथे लोकसहभागातून महादेव मंदीराच्या जिर्णोध्दाराच्या कामाला सुरूवात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल या गावातील मानकेश्वर महादेव मंदिराच्या र्जिणोध्दार करण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येत असुन प्रथम ग्रामस्थांच्या लोकसहभागातुन सुरुवातीला संरक्षण भिंत बाधण्याचा कामाला सुरवात करण्यात आली आहे.

मनवेल येथील मानकेश्वर महादेव मंदिर गावापासुन अर्धा किलोमिटर अंतरावर आहे. या क्षेत्रातील एक जागृत देवस्थान असुन अनेक भावीकांना व श्रद्धाळूंना या महादेव मंदिराचा साक्षात चमत्कार दिसुन आला आहे. युवक मंडळी व ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी महाशिवरात्र एकादशीला या मंदीरावर आर्कषक रोषणाई करून विविध धार्मीक कार्यक्रम घेण्यात येतात व आलेल्या देणगीतुन विकास कामे करण्यात येत असतात. महादेव मंदिराच्या एका बाजुला संरक्षण भिंत नसल्यामुळे मंदिरला धोका असल्यामुळे येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने संरक्षण भिंत बाधुन देणगीतुन मंदिराच्या र्जिणोध्दार करण्याचा संकल्पना गावांतील युवक मंडळीने घेतला असुन दानशुर व्यक्तीच्या माध्यमातून वर्गणी जमा करण्यात येत आहे.

या ठिकाणी मंदिराच्या परीसरात मोकळ्या जागेवर वाँलकंपाऊड करुन वेगवेगळ्या प्रकारची वृक्षांची लागवड करुन या मंदीराच्या परिसराला अधिक निसर्गमय गार्डन करणे, मंदिराची उभारणी करणे, शेतातील रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गुर ढोर करीता व शेतकरी व शेतमजुरांना पिण्याच्या पाणी व्यवस्था करणे यासह विविध कामे देगणीचा माध्यमातून करण्यात येणार आहे. या मंदिराच्या र्जिर्णोध्दार करण्यासाठी परिसरातील भाविकांनी आपला सहभाग नोंदवावा असे देविदास वसंत कोळी, नितीन कोळी, शिवाजी पाटील, गोकुळ कोळी, पन्नालाल पाटील, गणेश कोळी, विनायक कोळी यांचाशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Protected Content