सोमय्यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार !

मुंबई प्रतिनिधी । ज्येष्ठ भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार केली असून यात त्यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपविल्याचा आरोप केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आपण मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सूतोवाच केले होते. यानुसार त्यांनी तक्रार केली असून ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे ५ कोटीची संपत्ती आहे. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे १९ बंगले, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने जप्त केलेली ७८ एकर जमीन, संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची भागिदारी असलेली महाकाली गुंफेची जमीन बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव, मुंबई महापालिकेने दहिसर येथील २.५५ कोटीचा भूखंड बिल्डरला ३४९ कोटीला दिला, पाच हजार बेडवाल्या १२ हजार कोटीच्या रुग्णालयाच्या घोटाळ्याचे पुरावे मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Protected Content