‘मराठी भैय्ये’ आता माफी मागणार का ? – जितेंद्र आव्हाड

 

मुंबई, वृत्तसंस्था । सुशांतने आत्महत्याच केल्याचे उघडकीस आल्याने महाराष्ट्राची बदनामी करणारे ‘मराठी भैये’ माफी मागणार का असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासोबत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्सचा अहवाल आल्यानंतर आता सत्ताधारी नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करणं सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यापाठोपाठ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावरुन भाजपा नेत्यांना टार्गेट केले आहे.

याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले आहे की, सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.आता सीबीआयने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं आहे.

सुशांत प्रकरणावरुन विरोधकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात रान उठवलं होतं. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलील दबावाखाली करत असून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतंय असा आरोप करण्यात येत होता.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.