डोंगर कठोरा येथील अशोक तायडे यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील राहणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक खंडू तायडे यांनी दि. २२ एप्रिल रोजी कोरोना ह्या महाभयंकर विषाणूबाबत डोंगर कठोरा तालुक यावल येथील डोंगरपाडा या अतिदुर्गम भागात जनजागृती करून आदिवासींना मास्कचे वाटप केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कर्मवीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

आदिवासी बांधवांमध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराचे लक्षण व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत अशोक खंडू तायडे हे पाड्यावर जाऊन आदिवासी बांधवांना मोफत मास्कचे वाटप व मार्गदर्शन करत आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची व स्वतः च्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबत सखोल अशी माहिती लिंकवर्कर अशोक तायडे यांनी डोंगरपाडा येथे मार्गदर्शनपर माहिती देऊन सामाजिक बांधिलकी जपून जनजागृती केली. तायडे यांनी केलेल्या अशा उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन आज दि. २८ एप्रिल रोजी साई निर्मल फाउंडेशन यांच्यावतीने ‘कर्मवीर पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने त्यांना ई-सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. मला सन्मानपत्र मिळाले यात सर्वात महत्वाचा वाटा आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर अध्यक्ष भारती पाटील, रेणूप्रसाद वाघमारे यांच्या प्रेरणेमुळे मिळाले व हे सर्व श्रेय संस्थेत काम केल्याने मला प्राप्त झाले आहेअसे अशोक तायडे यांनी सन्मानपत्राने गौरविण्यात आल्याने आपल्या भावना व्यक्त केल्यात.

Protected Content