प्रकल्प बाधीतासाठी पुनर्वसन मंत्र्यांची २६ रोजी होणार बैठक

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – हतनूर प्रकल्प बॅक वाटरसह तापी-पूर्णा नदीपात्रामुळे प्रभावित झालेल्या मुक्ताईनगर मतदार संघातील या गावांच्या पुनर्वसन संदर्भात मदत, पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्या दालनात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हतनूर प्रकल्प व तापी-पूर्णा नदी पात्राच्या बुडीत क्षेत्रमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्याचे निराकरण अजूनही झालेले नाही. त्यामुळे प्रकल्प बाधित क्षेत्रातील नागरिक मुलभूत व पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत आ. चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाने मंत्रालयात मंत्री वडेट्टीवार यांच्या दालनात महपूर्ण बैठकीचे आयोजन २६ एप्रिल रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास करण्यात आलेले आहे.

या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर मतदार संघाचे आ. चंद्रकांत पाटील व प्रधान सचिव , मुंबई, नाशिक विभागीय आयुक्त रामकृष्ण गमे , जिल्हाधिकारी अभिजित राउत, जळगाव तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक , आणि संबंधीत अधिकारी व पदाधिकारी यांना या बैठकीत निमंत्रित करण्यात आले असल्याचे परिपत्रक मदत व पुनर्वसन विभागाचे विशेष कार्य अधिकारी रणधीर सूर्यवंशी यांनी दिले आहे.

Protected Content