पारोळा येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

पारोळा प्रतिनिधी । गरीब व गरजूंना अल्पदरात आहार मिळावा म्हणून आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने आज शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. गरीब व गरजूंसाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत शिवभोजन योजनेचा लाभ घेता येणार आहे. याप्रसंगी तहसिलदार अनिल गवांदे, शहर तलाठी निशिकांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, माजी नगरसेवक राजेंद्र पाटील, विकास बोरसे, दिलीप चौधरी, पैलवान अभय, रमेश, योगेश, राकेश शिंदे, समाधान मगर, मयुर वाणी आदी उपस्थित होते.

Protected Content