हातले येथील तरूणांचा दुचाकी अपघातात मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी । गुरांना चारापाणी करण्यासाठी शेतात जाणारा तरूण दुचाकीवरून घसरून पडल्याने १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील हातले येथे सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंदकरण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, विशाल संतोष बागुल (वय-१९) रा. हातले ता.चाळीसगाव हा तरूण २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमार मामाच्या शेतात गुरांना चारापाणी करण्यासाठी दुकाची क्रमांक (एमए १९, डीएन ३७१५) वरून जात असतांना गावातील सुभाष भोळे यांच्या शेताजवळ दुचाकी घसरून पडल्याने डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नेत असतांना विशालचा मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Protected Content