राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन दिसतील- अदित्य ठाकरे

पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्यूज  वृत्तसेवा । महाराष्ट्रात येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन दिसतील. पुणे हे मुख्य केंद्र असून बाकीचे ठिकाण त्यांना फॉलो करतील असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. पुण्यात राज्यातील पहिल्या इंधन परिषदेचे उद्घाटन अदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

 

पुण्यात राज्यातील पहिली पर्यायी इंधन परिषदेचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी यावेळी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी देखील केली. त्याचप्रमाणे पुण्यात बनलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या इका- ई-9 या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन देखील आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. पर्यायी इंथान कुठले मिळेल याचाही विचार चालू आहे. ज्या नागरिकांना इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे. त्यांच्यासाठी ही परिषद असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पुणे हे शहर ऑटोमोबाईलसाठी प्रसिद्ध  असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

 

पेट्रोल, डिझेलपेक्षा इलेक्ट्रिकवर खर्च कमी होतो. पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये सगळा खर्च आता बसेस वर होईल, तसेच महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील असेही ठाकरे यांनी बोलतांना सांगितले.

Protected Content