राज्य सरकारने गाळेधारकांचे प्रश्न मार्गी लावावे ; डॉ. शांताराम सोनवणे (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील गाळेधारकांचा प्रलंबित प्रश्न राज्य सरकारने लवकर मार्गी लावावा, राज्यातील गाळेधारकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आ. किशोर पाटील यांची मदत होत असून त्यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळात त्यांना स्थान द्यावे अशी मागणी जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

डॉ. शांताराम सोनवणे यांनी पुढे सांगितले की, जळगावच्या गाळेधारकांना योग्य न्याय मिळावा यासाठी आमचा लढा २०१२ पासून सुरु होता. त्याकरिता तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून भेट घेतली असता त्यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले होते. यानंतर काल दि. १० जुलै रोजी गाळेधारकांनी आमदार किशोर पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी गाळेधारकांचे प्रश्न लवकरात लवकर संपवून त्यांना योग्य न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असल्याचे डॉ. शांताराम सोनवणे यांनी स्पष्ट केले. किशोरअप्पा यांच्यामुळे आमच्या लढ्याला गती मिळाली असून त्यांनी पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. याच प्रमाणे राज्यातील गाळेधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा शिंदे मंत्रिमंडळ विस्तरात योग्य स्थान मिळावे अशी मागणी केली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, तेजस देपुरा, सुरेश आबा पाटील, छोटू सांगोरे, युवराज वाघ, पंकज मोमाया, वसीम काझी, रिजवान जागीरदार, आशिष सपकाळे, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, हर्षा बोरोले, संजय अमृतकर, प्रकाश गगराणी, गिरीश अग्रवाल, रमेश सूर्यवंशी, राजेंद्र शिंपी, भागवत मिस्तरी, रवी निकुंभ, अविनाश भोळे, दयालाल पटेल, आबा चव्हाण, अविनाश भोळे, अरुण पाटील, नितीन जगताप, कांचन आटाळे आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/716557002788237

 

Protected Content