अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे भ्रष्टाचार प्रकरणात तुरूंगात आहे. सीबीआय न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सोबतच सहकारी कुंदन शिंदे व संजीव पालांडे यांचा देखील अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. देशमुखांनी हा आरोप धुडकावून लावला होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने तिघांचे दोषारोपपत्र अपुर्ण दाखल केले. या कारणास्तव तिघांनी न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता. निर्धारीत वेळेत सीबीआयने कागदपत्रे सादर न केल्याचा युक्तीवाद अनिल देशमुख यांचे वकीलांनी केला होता. तर दुसरीकडे विहित मुदतीत आरोपपत्र दाखल केल्याचा खुलास केला आहे.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३ अन्वये आरोपीला अटक केल्यापासून ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे लागते. मात्र, जर ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झाले नाही, तर आरोपींना डिफॉल्ट जामीन मिळू शकतो.

Protected Content