महसूल विभागाचे काम कौतुकास्पद : आ. चौधरी

रावेर प्रतिनिधी । शासनाच्या महाराजस्व अभियाना मार्फत जास्तीत-जास्त लोकांना त्यांच्या गावात पर्यंत जावुन आदिवासी बांधवांना शासनाचे विविध प्रकारचे दाखले त्यांना त्यांच्या गावात मिळत आहे.यामुळे त्यांची पायीपीट थांबली आहे. परिणामी महसूल प्रशासना कडून चांगले काम होत असल्याचे प्रतिपादन आ शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले 

महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियाना अंतर्गत रावेर तालुक्यातील पाल या आदिवासी गावात विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले यावेळी आमदार चौधरी बोलत होते. या कार्यक्रमाला प्रांतधिकारी अशोक कडलक, तहसीलदार उषाराणी देवगुणे, सरपंच हजराबाई तडवी, उपसरपंच राजू चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पाल गावात नव्याने बांधकाम केलेले तलाठी कार्यालयाचे उदघाटन देखील करण्यात आले.

दाखल्यांचे केले वाटप 

यावेळी महाराजस्व अभियाना मार्फत ५३७ जातीचे दाखले ५४ रेशन कार्ड २९ आधार कार्ड २ वनदावे ५ कुटुंब अर्थसाहाय्यचे चेक आशा वर्कर यांना कोरोना योध्दा प्रमाणपत्रे यासह विविध शासना कडून महाराजस्व अभियाना अंर्तगत आदिवासी बांधवांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले.

हीच आमच्या कामाची पावती-प्रांतधिकारी 

आदिवासी भागात सेतु सुविधा नसल्याने विविध दाखले काढण्यासाठी तहसिल कार्यालय किंवा शहराच्या सेतु सुविधा केंद्रा पर्यंत जावे लागत होते. आदीवासी बांधवांची पायीपीट थांबावी म्हणून महसूल प्रशासना तर्फे हा महाराजस्व अभियान राबविला जातो.आज आदिवासी बांधवांना विविध प्रकारचे दाखले वाटप करतांना खुप समाधान वाटते आदिवासी बांधवांची पायपीट थांबली आणि आज त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान बघुन हीच आमच्या कामाची पावती आहे. पुढे देखिल गाव-पाड्यावर महाराजस्व अभियान राबविले जाणार असल्याचे कार्यक्रमात प्रांतधिकारी अशोक कडलक म्हणाले.

Protected Content