जैतपिर येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुकेश राजपुत

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जैतपिर येथील जि.प.केंद्र प्राथ शाळेत नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी  मुकेश राजपुत यांची तर उपाध्यक्षपदी शिवाजी बेलदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

त्याचबरोबर शिक्षणतज्ज्ञ अभिमन हरसिंग पा. सदस्यपदी जगन कोळी, रेखा सुरेश धनगर, संगीता बापू चौधरी, अर्चना सुरेश भिल, पूनम चिंधा कुंभार यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंच सुरेखाबाई देशमुख, उपसरपंच बेबा पा., सरपंच निलेश बागुल, ग्रा.प.सदस्य संजय चौधरी, संजय पा, विलास पा. कोमल पा. प्रमिला मोरे, बबा धनगर, ज्योती कोळी, व गावातील शिक्षक प्रेमी नागरिक राजाराम धनगर, धनराज बागुल, दशरथ कोळी, सुरेश भिल, बापू नाईक इ. नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्ताविक मुख्याध्यापक कणिराम जाधव यांनी तर सुत्रसंचालन प्रदीपसिंग पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक रविंद्र बोरसे, संजय शिसोदे, विजय पवार, कविता पाटील यांनी परिश्रम घेतले.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Protected Content