Home Cities जळगाव मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंके यांचा पदाचा राजीनामा

मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंके यांचा पदाचा राजीनामा

0
36

जळगाव, प्रतिनिधी ।मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा प्रदीप साळुंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई प्रल्हाद  पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यांनी तो राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी  प्रशासनाकडे पाठविला आहे.

 

 

मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा प्रदीप साळुंके यांनी घरगुती अडचणी व खाजगी वैयक्तिक कारणास्तव पुर्ण वेळे कामकाज करु शकत नसल्याने राजीखुशीने व स्वमर्जीने दि.२०.९.२०२१ पासून राजीनामा देत असल्याचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष्या ना. रंजनाताई यांना दिले आहे. सभापती सुवर्णा साळुंके यांचा राजीनामा जि. प. अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील यांनी पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठीविला आहे. त्यांच्या राजीनामा पत्रावर मुक्ताईनगर पंचायत समिती सदस्य सुनिता किशोर चौधरी व शुभांगी चंद्रकांत भोलाणे यांच्या साक्षीदार म्हणून स्वाक्षरी आहे.


Protected Content

Play sound