रावेर पंचायत समितीत जंबो बैठक

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील विविध योजनेचे  प्रलंबित घरकुल पूर्ण करण्यासाठी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी ग्राम सेवकांची जंबो बैठक घेतली. यात त्यांनी प्रलंबित घरकुले येत्या काही दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

रावेर पंचायत समिती येत्या शंभर दिवसात सर्व प्रलंबित घरकुल योजनेवर काम करणार आहे.यासाठी आज दिवसभर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परीषद गट निहाय ग्राम सेवकांच्या बैठका घेतल्या व त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

या विषयावर गाजली बैठक 

रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात भूमीहीना जागा उपलब्ध करून देणे,घरकुलांना शंभर टक्के मंजूरी देणे,प्रलंबित घरकुले पूर्ण करणे सर्व घरकुले आर्थिक दृष्टयापूर्ण करणे डेमो हाऊस उभारणे,नावीन्यपूर्ण उपक्रमाची अंबलबजावनी करणे कायम स्वरूपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थांना आधार लिंकिंग करणे यासह अनेक विषयावर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी जंबो बैठक घेतली.

 

Protected Content