ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील माहे जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील एकुण ६७ ग्रामपंचायतींची मुदत वरील नमुद कालावधीत संपत आहे.

नमुद केलेल्या वेळापत्रकानुसार आज दि. ०१ डिसेंबर रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी, संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसिल कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी अमळनेर तालुक्यातील एकुण ६७ ग्रामपंचायतीच्या नागरीकांनी सदर प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीचे अवलोकन करावे व ज्यांना प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादीवर सुचना व हरकती नोंदवावयाच्या असतील. त्यांनी दि.१ डिसेंबर ते दि.७ डिसेंबर २०२० पावेतो हरकती व सुचना लेखी स्वरुपात तहसिल कार्यालय, अमळनेर येथे कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे.

या आहेत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती

कलाली, निंभोरा, पिंपळी प्र ज., मेहरगाव, खेडी खु प्र.अ ग्रुप, कंडारी खुर्द ग्रुप, रामेश्वर खुर्द, रामेश्वर बु, सारबेटे खुर्द, सारबेट बु, सावखेडे, पातोंडा, सोनखेडी, एकलहरे, कळंबे, चौबारी, धानोरेग्रुप, बोदर्डे, सबगव्हान, शहापूर, प्र डांगरी, फाफोरे बु, शिरूड, जळोद, पिंगळवाडे, धावडे, नांद्री, एकरखी, जुनोने, एकतास, तांदळी, कावपिंरी, हिंगोने खु प्र अ, ढेकू खु ग्रुप, आंचलवाडी, पिंपळे बु,झाडी कुर्हे बु,देवगाव ग्रुप, सात्री, हिंगोने खु प्र ज, मुडी प्र अ ग्रुप, गांधली, पिलोदे, करणखेडे, गलवाडे खुर्द, गलवाडे बु, गडखांब ग्रुप, टाकरखेडा, पळासदडे, म्हसले, खेडी खु प्र ज ग्रुप, खवशी, दापोरी बु, पाडसे, वासरे ग्रुप, कलमसरे, बोहरे, लोण खुर्द, लोण चारम, मांडळ, जवखेडा, वाघोदे,आटाळे, आर्डी, निंब, पाडळसरे.

 

Protected Content