भाजप जळगाव महानगरची जंबो कार्यकारिणी जाहीर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप महानगरची रखडलेली कार्यकारिणी रात्री उशीरा जाहीर करण्यात आली असून यात तब्बल १६ उपाध्यक्ष व सहा सरचिटणीसांसह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

अलीकडेच भारतीय जनता पक्षाने दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांची नियुक्ती केली होती. यानंतर स्थानिक कार्यकारण्याची नियुक्ती नेमकी केव्हा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अनेकदा यादी येणार असल्याची चर्चा होत असली तरी कार्यकारिणी जाहीर झाली नव्हती. यातच पक्षातील अंतर्गत गटबाजी लक्षात घेऊन सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका वरिष्ठांनी घेतली. यामुळे यादीसाठी खूप वेळ लागला.

अखेर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश प्रभारी रवी अनासपुणे आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या महानगराध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांनी रात्री उशीरा कार्यकारिणी जाहीर केली.

नवी कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष असून यात माजी महापौर सीमाताई भोळे, माजी उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे व माजी उपमहापौर सुनील खडके यांच्यासह विशाल त्रिपाठी, राजेंद्र घुगे-पाटील, अजय गांधी, नितीन इंगळे, प्रकाश बालाणी मुकुंदा सोनवणे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मुकुंद मेटकर, सरोज पाठक, प्रदीप रोटे, विजय वानखेडे आणि राहूल वाघ यांचा समावेश आहे.

सरचिटणीस या महत्वाच्या पदांमध्ये जिल्हा दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, अमित भाटीया, जितेंद्र मराठे, ज्योती निंभोरे या मान्यवरांचा समावेश आहे. तर उर्वरित कार्यकारिणीत चिटणीस पदावर जयेश भावसार, दिनेश सोनवणे, सुचिता हाडा, अमित काळे, डॉ. क्षितीजचंद्र भालेराव, सागर पाटील, जयेश ठाकूर, भूपेश कुलकर्णी, कैलास सोमाणी, विठ्ठल पाटील, नितू परदेशी, अजित राणे, विनोद मराठे आणि केदार देशपांडे यांचा समावेश आहे. तर भाजप महानगर कोषाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यासोबत, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांमध्ये ६० मान्यवर तर विशेष निमंत्रीतांमध्ये पक्षाच्या प्रमुख नेते आणि पदाधिकार्‍यांसह एकूण ३४ जणांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे भाजप महानगरच्या कार्यकारिणीत तब्बल १३२ मान्यवरांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Protected Content