अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणा गावातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टवर तालुका पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणा गावातील नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतुक सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड, हरिलाल पाटील, अनिल मोरे, रामकृष्ण इंगळे, पोना संदीप पाटील यांचे पथक शनिवारी १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता रवाना केले. पथक गावात पेट्रोलिंग करत असतांना त्यांना नदीपात्राच्या किनार्‍याजवळ विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतुक करतांना दिसले. पथकाने चालकाला थांबवित त्याची चौकशी केली. तसेच वाळू वाहतुकीचा परवाना असल्याची विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना मिळून आला नाही. पोलिसांनी ते ट्रॅक्टर जप्त करीत चालक रहिम खान रऊफखान पठाण (वय-२४, रा. आव्हाणा ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content