दोन लाखांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पापा नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून दोन लाखांची मागणी करून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील पापा नगरातील माहेर असलेल्या शबानाबी शोएब मिर्झा वय-२० यांचा विवाह मध्यप्रदेशातील खंडवा येथील शोएब मिर्झा तरबेज यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे तीन महिने चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला लहान सहान कारणांवरून धमकावणे आणि शिवीगाळ करण्यास सुरूवात करण्यात आली. दरम्यान घराचे बांधकाम करण्यासाठी विवाहितेला माहेराहून २ लाख रूपये आणण्याची मागणी केली.

विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही म्हणून नाही म्हणून तिचा शिवीगाळ व मारहाण केली तर सासू, सासरे, दीर व मावस सासू यांनी देखील त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शोएब मिर्झा तरबेज, सासू मेहरूणबी तरबेज मिर्झा, सासरे तरबेज मिर्झा याकुब मिर्झा, दीर सर्फराज तरबेज मिर्झा आणि मावस सासू सोनी कमरोद्दीन शेख सर्व रा. खंडवा मध्यप्रदेश यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक तुषार चंद्रकांत इंगळे करीत आहे.

Protected Content