बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बांभोरी गावातून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात १२ वर्षीय मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिचे आई-वडील मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मध्यप्रदेश येथील राहणारा जामला पावरा याने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार घडल्यानंतर तिच्या वडिलांनी पीडित मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलगी कुठेही मिळाली नाही. अखेर शनिवार ४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी जामला पावरा याच्या विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.

Protected Content