Home धर्म-समाज युवा गुरव मंडळातर्फे सामूहिक उपनयन संस्कार

युवा गुरव मंडळातर्फे सामूहिक उपनयन संस्कार

0
114


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा युवा गुरव मंडळातर्फे सामूहिक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात झाला. यात १४ बटूंचे सामूहिक उपनयन संस्कार करण्यात आले.

शहरातील सरदार पटेल सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाआधी सकाळी मिनी ट्रेन गाडीतून बटूंची सवाद्य परिसरात मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, मंडळाचे अध्यक्ष मुकेश ओगले (गुरव) यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी योगेश गुरव, अमित कारेकर, राजू गुरव, जयंत शिंदे, सचिन शेटे, राहुल गुरव, कैलास ओगले, सागर नाटकर, गौरव गुरव, सारंग करकरे, जयंत गुरव, जगदीश गुरव, सोमनाथ गुरव, नामदेव नेवासकर, राजू नाटकर, सतीश गुरव, प्रकाश नाईक, चंद्रकांत सुरवाळे, सुरेश नाईक, महेश मानेकर आदींसह समाजबांधवांनी सहकार्य केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound