Home Cities धरणगाव धरणगावात शिवजयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन

धरणगावात शिवजयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन

0
42


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून धरणगावातील बस स्थानकात पाणपोईचे उद्घाटन येथील पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.

एस.टी.स्टँड मध्ये पिण्यासाठी पाण्याची सोय नाही, हे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र ठाकरे यांच्या निर्देशनात आल्या नन्तर व प्रवाशी वर्गार्ची भर उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी धावपळ बघून त्यांनी पाणपोईसाठी नियोजन केले व हेमंत माळी शिवसेना शाखा संजय नगर,वाल्मिक भाऊ पाटील,व हेल्प मेन्स पार्लर यांच्या सहकार्याने आज शिवजयंतीच्या शुभ दिवशी पाणपोईचे उदघाटन धरणगाव पोलीस स्टेशनचे पि.एस.आय.आहिरेयांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमास शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उप तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, हेमंत भाऊ माळी, एस.टी.स्टँडचे कॅट्रोलर जितेंद्र सोनवणे, खटाताई बाविस्कर, पो.हव.विनोद संदानशीव, नगरसेवक भानुदास विसावे, भागवत चौधरी, प्रकाश पाटील, किरण अग्निहोत्री, विलास माळी, वाल्मिक पाटील, राहुल रोकडे, डॉ.विलास माळी, सुनील चौहान, सतीश बोरसे, रवी जाधव, नंदू पाटील, जितेंद्र धनगर, वाल्मिक पाटील, विजय महाजन, कमलेश बोरसे, प्रवीण निकम, सागर चौधरी, बुत्या पाटील, राजू चौधरी, भीमा धनगर यांच्या सह शेकडो शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound