महिला डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचा आएमएतर्फे काळ्या फिती लावून निषेध

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राजस्थान राज्यातील कायदा आणि अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे एका आघाडीच्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे, या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी काळ्या फिती बांधून कामकाज करत निषेध व्यक्त केला आहे.

 

कोणतीही वैद्यकीय चौकशी न करता थेट मनुष्यवधाचा आरोप केल्यामुळे राजस्थानमधील स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टरला आत्महत्या करावी लागली. या घटनेविरोधात वैद्यकीय क्षेत्रातून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच डॉक्टरांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करणारा केंद्रीय कायदा लागू करण्याची मागणी इंडियन मेडिकलअसोसिएशनचे जिल्हा सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे यांनी केली आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायदा २०१९ साली प्रस्तावित करण्यात आला होता. यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्यांना मारहाण किंवा हिंसाचार केल्यास सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि ५० हजारापासून पाच लाखांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा त्वरित लागू करण्यात यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी जिल्हा सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली आहे.

Protected Content