पहूर येथे शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिर

पहूर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेत शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाचे उद्घाटन जामनेर गट शिक्षण अधिकारी विजय सरोदे, पाचोरा गटशिक्षणाधिकारी एन. एफ. चौधरी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अफजल खान, पत्रकार गणेश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अफजल खान हे होते याप्रसंगी पंडित बाविस्कर, बिडे सर, केंद्रप्रमुख वराडे सर ,उपसरपंच राजू जाधव, आदर्श शिक्षक संजय पाटील, गजानन गवारे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक विजय सरोदे, एन. एफ. चौधरी, बिडे सर ,पंडित बावस्कर, पत्रकार गणेश पांढरे, अध्यक्षीय भाषण अफजल खान आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र शाळेतील सांगवी, खर्चणा, लोढ्ररी, शेरी, पिंपळगाव तांडा, हिवरी ,हिवरखेडा आदी गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन या प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक पंडित बाविस्कर यांनी तर आभार मुख्याध्यापक रवींद्र खोडपे यांनी मानले. शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जि प केंद्र शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोडपे, वंजारी सर व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

Protected Content