श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

जामनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरापासून अवघ्या २ मैलावर स्थित श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पळासखेडे बु. येथे आठदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात “रेझोनन्स २K२२” हे उत्साहात साजरे करण्यात आले.

वार्षिक स्नेहसंमेलनच्या पहिले चार दिवस म्हणजेच ९ ते १२ मार्च २०२२ दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा नंतरचे चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर आर. भुरट, डी. फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील बावस्कर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल पाटील समवेत क्रीडा समितीमधील सर्व सदस्य उपस्थित होते. या ४ दिवसीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रा. भुषण गायकवाड, प्रा. संदीप चौधरी, प्रा. कांचन महाजन, विद्यार्थ्यांमधील नियुक्त क्रीडा सचिव, सागर चौधरी तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर १४ मार्च ते १७ मार्च दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन, “रेझोनन्स २K२२” अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे उद्घाटन संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर आर. भुरट, डी. फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील बावस्कर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल पाटील, प्रा. रुपल भुरट उपस्थित होते. ८ व्या दिवशी म्हणजेच १७ मार्च रोजी संध्याकाळी आगळ्या-वेगळ्या, मनमोहक आणि आकर्षक अशा उभारलेल्या तंबूमध्ये सर्वोत्कृष्ट आणि सर्वात महत्त्वाचा प्रेक्षणीय असा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडीया, संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडीया, संस्थेतील संचालक अभय कावडीया, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर भुरट, उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल पाटील, डी फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील बावस्कर, “केसावर फुगे” या गाण्यासाठी लोकप्रिय असलेले गायक अण्णा सुरवाडे, प्रा. भूषण गायकवाड, प्रा. रूपल भुरट, विद्यार्थी परिषदेतील सदस्य -(सागर चौधरी, नीलेश गावंडे, परेश चौधरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राजकुमार कावडीया व मनोजकुमार कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. सुनील बावस्कर यांनी केले. विजेत्यांचा बक्षीस वितरण करण्यात आले. दरम्यान, अण्णा सुरवाडे यांनी आपले लोकप्रिय झालेले गाणे “केसावर फुगे” गाऊन प्रेक्षकांमधील जोश वाढवला. प्रा. रूपल भुरट यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रभारी प्रा. सुनील बावस्कर व प्रा. रूपल भुरट समवेत इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामकाज पहिले. त्यांना संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडीया आणि फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर भुरट यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content