जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. रस्ता खोदत असतांना निघणारे गौण खनिज हे गेल्या काही महिन्यापासून कंत्राटदाराकडून वेगवेगळ्या कारणाने परस्पर वितरण करण्यात येत आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराशी संपर्क साधला असता त्यांनी सदरचे गौण खनिज हे पाळधी येथील एका शेतकऱ्याला देवुन त्या बदल्यात आम्ही मुरूम घेत आहोत, अशी माहिती मिळाली. परंतू प्रत्यक्ष मात्र हे गौण खनिज गेल्या काही महिन्यांपासून सदरच्याच एका प्रतिष्ठित शेतकऱ्याचा पडिक जमिनीत पडून असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर गौण खनिजावर असणारा महसुल शासनाकडे जमा होत आहे किंवा नाही याची शंका वाटते? त्यामुळे महसुल विभागाने सदरच्या कंत्राटदाराची योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी पहूर येथील नाजरीकांकडून करण्यात येत आहे. तसेच चौपदरीकरणाचे काम सुरू असतांना ब्रिटिश कालीन रेल्वे क्रॉसिंग वर असणाऱ्या सिमेंटच्या मोरीचे रॉड व इतर लोखंडी साहित्य नेमके कुठे आहे याचीही कसुन चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

Protected Content