वै. डिगंबर महाराज चिनावलकर मठात रंगला आषाढी यात्रा महोत्सव !

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील वै. डिगंबर महाराज चिनावलकर मठात आज आषाढी यात्रा महोत्सव पार पाडला असून यात हजारो वारकरी सहभागी झाले.

 

श्री क्षेत्र पंढरपूर येथे वै डिंगम्बर महाराज चिनावल कर मठात प्रति वर्षाप्रमाणे आषाढी यात्रा महोत्सव  सुरू असून यावल रावेर तालुक्यातील वारकरी व भाविकांनी सुमारे आठ दिवसापासून हजेरी लावली आहे. भक्तनिवास भरगच्च भरले असून मठात पायीदिंडी सोहळा सुमारे २४ दिवस कडक उन्हात वाटचाल करून पोहचला आहे. दिंडीचे नेतृत्व दुर्गादास महाराज नेहते यांनी केले.

 

दररोज भागवत कथा सुरू असून दुर्गादास महाराज नेहते, पराग महाराज चोपडे,  भाऊराव महाराज, धनराज महाराज अंजाळेकर, रवींद्र महाराज हरणे, रितेश महाराज चौधरी,  भरत महाराज म्हैसवडीकर यांचे कीर्तने होत आहेत. महोत्सवात रवींद्रभैय्या पाटील  यांनी उपस्थिती दिली. समवेत विशाल महाराज खोले होते. यावेळी रवींद्र पाटील यांचा संस्थेच्या वतीने सचिव विठ्ठल भंगाळे यांनी सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी प्रास्ताविक केले.

 

या महोत्सवात संस्थेचे उपाध्यक्ष घनश्याम पाटील, विश्‍वस्त किशोर बोरोळे, जयराम पाटील,  सुनील भंगाळे, शरद महाजन,  धनंजय चौधरी, अतुल तळेले,  मधुकर बोंडे, रमेश पाटील,  सौ ललिता महाजन, नरेंद्र पुरुषोत्तम चौधरी, हिरेंद्र चौधरी, अशोक चौधरी, भागवत चौधरी, अर्जुन महाजन यांचेसह अनेक कार्यकर्ते महोत्सव यशस्वीपणे पार पाडणेकरिता परिश्रम घेत आहेत. सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात अन्नछत्र सुरू असल्याचे व सर्व कार्यक्रम उत्स्फूर्तपणे सुरू असल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

Protected Content