आम्ही कोणत्याही दबावात नाही, पण भाजपच खड्ड्यात जात आहे- राऊत

मंत्री परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांची इडी चौकशी सुरु झाली आहे.  यावर मंत्री परब यांच्या पाठीशी सर्व महाविकास आघाडीचे नेते ठामपणे उभे आहेत. यंत्रणांचा  गैरवापर केला तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार, उलट यामुळे भाजपा रोजच खड्ड्यात जात असल्याची टीका खा. संजय राऊत यांनी केली आहे.

महाविकास आघाडीतील शिवसनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या खाजगी आणि शासकीय निवासस्थान तसेच अन्य सात ठिकाणी इडीने छापे टाकत तब्बल १२ ते १३ तास चौकशी केली. यावरून मंत्री अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून ऐन मनपा निवडणुकीपूर्वीच हि कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील मनपाचे सभापती यशवंत जाधव यांच्यावर कारवाई झाली आहे. तर आता परब याच्यावर कारवाई झाली आहे.
यावर खा. संजय राऊत यांनी राज्यातील राजकारणाला इतके वाईट वळण लागलेले नाही. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यामुळे महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचे मनोबल कमी होणार नाही. याउलट भाजपच रोज खड्ड्यात जात आहे अशी टीका राऊत यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.