राज्यस्तरीय भौगोलिक शास्त्र परीक्षेत साधना विद्यालयाच्या विद्यार्थिनीला ‘गोल्ड मेडल’

IMG 20200201 WA0019

एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील कासोदा येथील साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षात दि. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भोगोलिक शास्त्र परीक्षेत (state level geography talent search compitationExaminatio)साधना विद्यालयाची इ. ९ वी ची विद्यार्थिनी कु. यामिनी रमेश चौधरी हीला गोल्ड मेडल मिळाले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत परीक्षेसाठी विद्यालयातून ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते .तीन महिने उलटल्या नंतर परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा १०० टक्के रिझल्ट लागला आहे. परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे १५ विद्यार्थी तर इतर सर्व विद्यार्थी डिस्टींक्शन श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यानिमित्ताने दि. ३०जानेवारी रोजी कु. यामिनी या विद्यार्थिनीचा शिक्षकांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. तर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

परीक्षेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्द्ल जेष्ठ शिक्षिका एल. बी. पाटील यांचा सत्कार एम.एस.पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Protected Content