यावल शहरातील आठवडे बाजार शनिवारी भरणार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तोन शुक्रवार ऐवजी शनीवारी भरण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढले आहे अशी माहिती नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

१४ एप्रील रोजी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. यावल शहरात देखील सदरची डॉ बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक शहरातील आठवडे बाजार परिसर पंचशिल नगर आणी बोरावल गेट जवळील आंबेडकर नगर अशा दोन भागातुन मिरवणुक काढण्यात येते. त्यापैक्की शहरातील आठवडे बाजार हे मिरवणुक निघणारे परिसर राज्य महामार्गाला लागुन असल्यावे त्या ठीकाणी बाजाराची खुप गर्दी होत असते या भागातुन निघणारी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणुक आठवडे बाजार परिसरातुन निघुन शहरातील प्रमुख मार्गाने होत पुनश्च आठवडे परिसरातील पंचशिल नगर येथे मिरवणुकीचे विसर्जन करण्यात येते. त्याकरीता यावल शहरातील शुक्रवारी १४ एप्रिल रोजीचा आठवडे बाजार हा शनिवारी १५ एप्रिल रोजी भरविण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढले आहे. त्यानुसार विक्रेत्यांसह व्यापारी यांनी या आदेशाची नोंद करण्यात यावी असे आवाहन नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी केले आहे. दरम्यान, मिरवणुक निघण्याचे स्थळ आणी जाण्याच्या  संपुर्ण मार्गाची उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ . कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यात आली .

Protected Content