निलेश विसपुते उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न शिक्षक पुरस्कारांने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) पैंलाड येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाचे क्रीडा शिक्षक निलेश विसपुते यांना नाशिक येथे क्रीडा साधना व के.एन.डी.संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग पाच जिल्हे मिळून २०१९ चा क्रीडा रत्न शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

 

विसपुते सर यांनी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत खेळाडूनां विविध खेळात तालुका,जिल्हा,विभाग,राज्यस्तरावर नेले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सुध्दा उत्कृष्ट असे कार्य केलेले आहे.त्यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. निलेश विसपुते यांना संतोषजी भोसले(उपअभियता), डॉ.जयप्रकाशजी दुबळे(नाशिक विभागीय उपसचांलक), रविंद्र नाईक(जिल्हा क्रीडा अधिकारी,नाशिक),राज्य शारीरिक शिक्षक सघंटना अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे,रविंद्र मोरे,विश्वनाथ पाटोळे,आनंद खोरे,संजयजी पाटील यांच्या हस्ते भव्य अशा कार्यक्रमात हा पुरस्कार सहपरिवार प्रदान करण्यात आला. निलेश विसपुते यांना के.डी.गायकवाड हायस्कुलचे मुख्याध्यापक ए.व्ही.नेतकर,अमळनेर तालुका क्रीडा समिती अध्यक्ष सुनिल वाघ,अमळनेर तालुका क्रीडा समिती यांचे मौलांचे सहकार्य लाभून हे यश प्राप्त केले. संस्थेचे चेअरमन,पर्यवेक्षक सरचिटणिस व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Add Comment

Protected Content