पहिले ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित सह्याद्री वाहिनीवर टीलिमिली मालिका

शेअर करा !

धरणगाव, कल्पेश महाजन । राज्यातील पाहिले ते आठवी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टीलिमिली ही मालिका २० जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा उघडण्यात आलेल्या नसून विद्यार्थ्यंना घरीच अभ्यास करता यावा याकरिता एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनतर्फे या मालिकेची निर्मिती करण्यात आंली आहे.

store advt

एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशनतर्फे हा प्रकल्प राज्यभरात तयार करण्यात आलेला आहे. राज्यातील दीड कोटी विद्यार्थ्यांना या मालिकेमुळे शिकण्याची संधी प्राप्त होणार असून कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद झालेले आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र इंटरनेट स्मार्टफोन आणि साधने उपलब्ध होण्याच्या अडचणीमुळे ऑनलाईन शिक्षणात अडचणी निर्माण होताना दिसून येत आहेत. जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी गरीब विद्यार्थी पालक वर्ग ग्रामीण भाग या ठिकाणी इंटरनेट स्मार्टफोन यांच्या अडचणी विद्यार्थ्यांनादेखील येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ही मालिका सुरू करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने संस्थेने पहिली ते आठवीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन मालिकेचे नाव टीलिमिली ठेवण्यात आले.  ही मालिका बालभारतीच्या पहिली ते आठवी या इयत्तांच्या पाठ्य पुस्तकातील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असेल. त्यात व्याख्या न देता मुलांना घरी आणि परिसरात करून बघता येईल अशा कृती निष्ठा उपक्रमांचा समावेश या मालिकेत करण्यात आलेला आहे. हसत-खेळत या मालिका राबवण्यात येणार आहे. रोज प्रत्येक इयत्तेचा एक विषयाच्या 1पाठ याप्रमाणे प्रत्येक नेत्याचे ६० ६० ६० दिवसात सात भागांत द्वारे सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे सहा दिवस हे सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे पिली ही मालिका सलग दहा आठवडे आपल्या दूरदर्शन चैनल वर प्रसारित करण्यात येणार आहे.

टीलिमिली मालिकेच्या प्रकल्पात प्रयोगशील शिक्षणाच्या भरीव कार्य केलेल्या ग्राममंगल आणि इतर नामांकित संस्था तज्ञांचा सक्रिय सहभाग करण्यात आलेला असून मालिकेत विद्यार्थ्यांना स्वच्छ आनंदी वातावरण भावनिक सुरक्षितता असेल चुका करत स्वतःची अर्थ बांधणी स्वतः स्वतः करण्याचे स्वतंत्र दिलेले असेल असे केल्याने मुले हसत खेळत स्वतः कसे शिकतात हे मालिकेचे आहे या मालिकेचे उद्दिष्ट आहेत असे सहज आनंददायक व ज्ञान व विज्ञानवादी प्रक्रिया उलगडत साहित्याने मुलांना ही मालिका रोज स्वतः शिकण्याची प्रेरणा देईल त्यांचा आत्मविश्वास वाढेल ृती निष्ठ शिक्षणामुळे पालकही त्यांना सहभाग होऊ शकतील मराठी माध्यमातील मराठी समजणार्‍या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी ही मालिका उपयुक्त ठरेल व विद्यार्थी ही मालिका व त्यांच्या परिवार हसत-खेळत बघेल मालिकेत आठवी इयत्तेचे मिळून ४८० भाग २० जुलै ते  २६ सप्टेंबर या कालावधीत प्रसारित करण्यात येणार आहेत अशी माहिती एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन पुणे अध्यक्ष विवेक सावंत यांनी दिली.

मालिकेचे वेळापत्रक
सकाळी साडेसात ते आठ इयत्ता आठवी
सकाळी आठ ते साडेआठ सातवी
सकाळी ९ ते साडेनऊ सहावी
सकाळी साडेनऊ ते दहा पाचवी
सकाळी दहा ते साडे दहा चौथी
सकाळी साडेदहा ते अकरा तिसरी
सकाळी साडेअकरा ते दुपारी बारा दुसरी
दुपारी बारा ते साडेबारा पहिली

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!