इचलकरंजी येथे प्रजासत्ताक दिनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतच जातीच्या दाखल्याचे वाटप

सांगली, वृत्तसेवा | जातीचा दाखला मिळविणे ही एक किचकट प्रक्रिया मानली जाते. परंतु, प्रजासत्ताक दिनी इचलकरंजी येथील श्रीमती बाळाबाई केशवलाल शहा माई बाल विद्या मंदिरात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र शाळेतच वाटप करण्यात आल्याने ही एक सुखद घटना मानली जात आहे.

 

७३ वा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजकुमार कूट व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. शोभा कूट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा प्रा. निर्मला ऐतवडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेतील बालवाडी शिक्षिका मधु कुलकर्णी यांना यावर्षीचा ‘सावित्रीची लेक आदर्श शिक्षिका’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शाळेतच जातीच्या दाखल्यांचे वाटप ही यावेळी करण्यात आले. जातीचा दाखला मिळणे ही एक किचकट प्रकिया असते . प्रांत व तहसील कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात. पण शाळेच्या मुख्याध्यापिका शैला कांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ शिक्षिका लता नाईक यांनी पुढाकार घेत त्यांना सूरज कोळी यांनी शासनाच्या ई सुविधा मधून सहकार्य केले. त्यामुळे कमीत कमी कागदपत्रे देत विद्यार्थ्यांना जात प्रमाण मिळाले. सांगली जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जातप्रमाणपत्र शाळेतच मिळावे अशी अपेक्षा या निमित्त होत आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रा..निर्मला ऐतवडे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यानिमित्त शाळेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या ७५ उपक्रमांचे सादरीकरण व कलाशिक्षिका शर्मिष्ठा फाटक यांच्या पेंटिंग व कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यातील सर्व कलाकृती बद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा प्रा. निर्मला ऐतवडे ,सेक्रेटरी डॉ. मीना तोसनीवाल, संस्थेचे सल्लागार डॉ. .ए.के. चौगुले, डॉ..लक्ष्मीकांत तोसनीवाल तसेच संस्थेच्या माजी अध्यक्षा व सर्व पदाधिकारी , शाळेच्या मुख्याध्यापिका शैला कांबरे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मनिषा पाटील यांनी केले.

Protected Content