विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आजपासून सॉफटवेअर सराव चाचणींना प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी परीक्षा ५ जानेवारी पासून ऑनलाईन सुरु होणार असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आजपासून सॉफ्टवेअरच्या हाताळणी सराव चाचणींना प्रारंभ झाला असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

५ जानेवारीपासून ऑनलाईनच्या माध्यमातून हिवाळी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपात असणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेंसाठी युझर मॅन्युअल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. २९ डिसेंबर पासून सराव चाचण्यांदेखील सुरुवात झाली आहे. बी.ए., बी.कॉम., बी.बी.ए., बी.एस.डब्ल्यू., सत्र २, ४ व ६ चे पुन:परीक्षार्थी यांच्या मॉक टेस्ट सुरु झाल्या आहेत. टप्या टप्याने इतर वर्गांच्या मॉक टेस्ट घेतल्या जाणार असून याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

Protected Content