मु.जे.महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकाचा अकस्मात मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ सोनू भोसले (वय-५०) रा. दादावाडी, जळगाव हे शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात सुरक्षा रक्षक म्हणून गेल्या दहा वर्षांपासून काम करतात. आज पहाटे सकाळी ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास पाण्याच्या नळाजवळ पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्याचा नळाजवळ मृत्यू झाला. सकाळी ६.३० वाजेच्या सुमारा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीसात संपर्कसाधुन घटनेची माहिती दिली. रामानंदनगर पोलिसांनी मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content