Home क्राईम अरविंद देशमुख यांच्या पाठपुराव्याने हायवेच्या कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अरविंद देशमुख यांच्या पाठपुराव्याने हायवेच्या कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरसोद ते पाळधी बायपास नादुरूस्त असल्याने आजवर सहा बळी गेले असून यात काल रात्री झालेल्या अपघात प्रकरणी ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरसोद ते पाळधी बायपास नादुरूस्त असल्याने येथील वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली असून यामुळे शहरातून जाणाऱ्या हायवेवर वाहतुकीचा मोठा ताण आला आहे. यामुळे जळगाव शहरात गेल्या महिन्याभरात पाच बळी गेले आहेत. तर काल रात्री बायपासवरच अपघात झाला. यात दुरुस्ती सुरू असलेल्या लेनवर ट्रक आणि तवेरा गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तवेरामधील प्रवासी शांताराम केशव पाटील (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, जळगाव तालुका पोलिसांनी सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल बायपासची कंत्राटदार कंपनी ‘अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक अर्थात एमडी शैलेंद्र सिंघल, जनरल मॅनेजर दत्ता आणि संबंधित साईट अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी ‘काम सुरू आहे’ असे दर्शवणारे कोणतेही रिफ्लेक्टिव्ह बोर्ड, बॅरिकेडिंग किंवा रात्रीच्या वेळी सावध करण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात नव्हते, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

बायपासच्या कंत्राटदार कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी पाठपुरावा सुरू केला होता. या अनुषंगाने हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता आधी याच प्रकारे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रकरणात देखील सदर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound