आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची ‘डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतासाठी ही एक अभिमानाची बाब मानली जात आहे.

 

डॉ. हर्षवर्धन यांची जपानचे डॉक्टर हिरोकी नकतानी यांच्या जागी नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या 34 सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झाले आहे. 194 देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. तसेच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहाने सर्वांच्या संमतीने घेतला होता. २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमध्ये या कार्यकाळी मंडळाचे पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येते. तसेच २२ मे पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.

Protected Content