वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची शक्यता

मुंबई Mumbai प्रतिनिधी । पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी गोत्यात आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची शक्यता बळावली असून ते स्वत: मात्र अद्यापही नॉट रिचेबल असल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.

पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case)आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी प्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला आहे. रूणीच्या आत्महत्या प्रकरणी गोत्यात आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची शक्यता बळावली असून ते स्वत: मात्र अद्यापही नॉट रिचेबल असल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.

Protected Content