ईडीच्या गैरवापराच्या विरोधात रावेरात राष्ट्रवादीची निदर्शने

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशासह महाराष्ट्रात ईडी,सिबिआय सह केंद्रीय यंत्रणा यांचा गैरवापर थांबवण्यासाठी रावेरात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी निदर्शने केली.

रावेर शहरात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक होऊन केंद्र व राज्य सरकारविरुध्द जोरदार निदर्शने करून तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस देऊन चौकशी करीता बोलविले याचा निषेध करण्यात आला असून सत्ताधार्‍यांना इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दबाव तंत्राविरुध्द रावेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे जोरदार निदर्शने करून तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आले आहे.

यावेळी माजी आमदार अरुण पाटील, प्रदेश सेल उपाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, रावेर बाजार समिती संचालक राजेंद्र चौधरी, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, मुकेश येवले, वसंत पाटील, समाधान पाटील, पवन जैन, प्रविण पाटील, शेख सलिम, सचिन पाटील आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content